Home संगमनेर संगमनेर शहरात वाळूच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने अपघातात बालक जागीच ठार, एक जखमी

संगमनेर शहरात वाळूच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने अपघातात बालक जागीच ठार, एक जखमी

Sangamner Accident child was killed on the spot when he was hit by a sand tractor

संगमनेर |Accident| Sangamner:  संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरात भरधाव जाणार्‍या वाळूच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) बालक जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. संगमनेर शहर व परिसरात वाळूची बेकायदेशीर वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. महसूल व पोलीस खात्याचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने वाळूतस्करांची चांगलेच फावले आहे. वाळू तस्करांवर नियंत्रण नसल्याने दिवस-रात्र वाळूचा उपसा सुरू आहे.

काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कोल्हेवाडी रोड परिसरातून नंबर नसलेला एक ट्रॅक्टर वाळूची वाहतूक करत होता. गर्दीच्या रस्त्यातून तो भरधाव जात असताना या ट्रॅक्टरने एका बालकाला धडक दिली. या अपघातात एका बालकाचा जागीच मृत्यू झाला व एकजण जखमी हा एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. अपघातानंतर वाहन चालक मात्र पसार झाला. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. घटनेची माहिती समजताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून बालकाचा मृतदेह हलवला. याबाबत रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Web Title: Sangamner Accident child was killed on the spot when he was hit by a sand tractor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here