Home महाराष्ट्र Weather alert: येत्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Weather alert: येत्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Weather alert rain Come in two days

Weather alert:  मराठवाड्यात थंडीचा जोर वाढत होता. तर अनेक भागांत चांगलीच हुडहुडी पाहायला मिळाली. दरम्यान मागील दोन तीन दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होताना पहायाला मिळत आहे. दरम्यान

दरम्यान मराठवाड्यात पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तविली आहे. मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. मात्र २८ डिसेंबर रोजी परभणी व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर औरंगाबाद व जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची आणि तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच २९ डिसेंबर रोजी जालना, परभणी, हिंगोली, व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाउस पडण्याची शक्याता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.   

Web Title: Weather alert rain Come in two days

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here