Home संगमनेर संगमनेर नाशिक पुणे महामार्गावर कार दुचाकी धडकेत ग्रामपंचायत सदस्य मृत्यू तर पत्नी...

संगमनेर नाशिक पुणे महामार्गावर कार दुचाकी धडकेत ग्रामपंचायत सदस्य मृत्यू तर पत्नी जखमी

Sangamner Accident Gram Panchayat member killed in a car-bike collision

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने पती ठार तर पत्नी जखमी झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली.

बावपठार नांदूर खंदरमाळ येथील माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊराव शिवराम भागवत वय ७० यांचे अपघातात निधन झाले तर त्यांची पत्नी इंदुमती भागवत जखमी झाल्या आहेत.

 भागवत पती पत्नी हे दोघेजण सोमवारी सकाळी कामानिमित मोटारसायकलवरून संगमनेरला जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने चंदनापुरी शिवारात दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही पती पत्नी जखमी अवस्थेत रस्त्यावर महामार्गावर पडलेले होते. परिसरातील नागरिकांनी जखमींना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच भाऊराव भागवत यांचा मृत्यू झाला. या अज्ञात कारचा पोलीस शोध घेत आहे. या घटनेने बावपठार तसेच नांदूर खंदरमाळ गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Sangamner Accident Gram Panchayat member killed in a car-bike collision

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here