Home अकोले अकोले तालुक्यात दोन बिबट्यांची झुंज, दोन्ही बिबट्यांचा मृत्यू

अकोले तालुक्यात दोन बिबट्यांची झुंज, दोन्ही बिबट्यांचा मृत्यू

Two Bibatya fight in Akole taluka both die

अकोले | Akole Taluka: अकोले तालुक्यातील लाहित शिवारात दोन बिबट्यांची झुंज रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. या झुंजीत दोनही बिबट्यांच्या मृत्यू झाला आहे.

अकोले वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, लाहित शिवारातील एका उसाच्या शेतात रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास एक आठ महिन्याची मादी व एक सव्वा वर्षाचा नर बिबट्या यांच्यात झुंज सुरु होती. यावेळी त्यांचा आवाज ऐकून शेजारी जागे झाले. मात्र समोर जाण्याचे कोणीही धाडस केले नाही.

सोमवारी सकाळी या लोकांनी पाहिले असता दोनही बिबटे मृत्यू झाल्याचे आढळून आले. लोकांनी सदर घटना ही  अकोले वनविभागास कळविली. या घटनेची माहिती समजातच अकोले येथील वनक्षेत्रपाल भाग्यश्री पोले यांनी उप विभागीय वन अधिकारी जी. ए, झोळे यांना कळविली.

उपविभागीय वनअधिकारी झोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल पोले व वनरक्षक घोड्सरे हे घटनास्थळी दाखल होऊन स्थानिकाकडून माहिती घेतली व या दोन्ही बिबट्यांचा पंचनामा केला. या दोनही बिबट्यांचे शवविचेदन करण्यात आले. बिबट्यांच्या अंगावर जखमा आढळून आल्या. वनक्षेत्रपाल पोले यांनी काही नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगितले.

Web Title: Two Bibatya fight in Akole taluka both die

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here