Home Accident News मालवाहू ट्रक व दुचाकीच्या धडकेत संगमनेर तालुका ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल जागीच ठार...

मालवाहू ट्रक व दुचाकीच्या धडकेत संगमनेर तालुका ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल जागीच ठार  

Sangamner Head Constable killed on the spot in car-truck collision 

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथील बाजारतळानजीक असलेल्या पुलावर मालवाहू ट्रकणे दुचाकीला जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे गावानजीक हा अपघात घडला.

संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ रामकृष्ण बर्वे वय ४८ हे अपघात मृत्यू झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल एकनाथ बर्वे हे लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्याने दुचाकीवरून प्रवास करीत असताना तळेगाव दिघे येथील बाजारतळा नजीकच्या पुलावर ते आले असता मागून आलेल्या मालवाहू ट्रकणे (क्रमांक केए ३२ सी ५१६६)   त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात बर्वे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांनी प्रवास करीत असताना डोक्यात हेल्मेट वापरले होते मात्र हेल्मेट बाजूला जाऊन पडले. या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांना समजताच त्यांनी पोलिसांना कळविले.

मालवाहू ट्रक चालक ट्रक तेथेच सोडून पसार झाला आहे. मात्र पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले आहे. या अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Sangamner Accident  Head Constable killed on the spot in car-truck collision 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here