Home Accident News संगमनेर: नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने उलटला

संगमनेर: नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने उलटला

Sangamner Accident Nashik-Pune National Highway overturned 

Ahmednagar news Live | Sangamner Accident | संगमनेर:  नाशिक पुणे महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. ब्रेक निकामी झाल्याने बासमती तांदूळ घेऊन पुण्याच्या दिशेने जाणारा ट्रक नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे उपरस्त्यावर उलटल्याची घटना गुरुवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात (Accident) झाला.

याबाबत अधिक  माहिती अशी की, मालवाहू ट्रक (क्रमांक आर.जे.०९ जी.बी.५८९५) चालक सुनील सिंग (महानपूर,जम्मू काश्मीर) हा दिल्ली येथून बासमती तांदूळ घेऊन संगमनेर मार्गे पुण्याच्या दिशेने जात होता. गुरुवारी पावणे बारा वाजलेच्या दरम्यान  मालवाहू ट्रक नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आंबी फाटा येथे आला असता ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने गतिरोधकावर ट्रक आदळून चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. ट्रक महामार्गाच्या उपरस्त्यावर जाऊन उलटला. अपघातग्रस्त ट्रक व ट्रकमधील माल हे रस्त्यावरच असल्याने उपरस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. चालक सुनील सिंग किरकोळ जखमी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Web Title: Sangamner Accident Nashik-Pune National Highway overturned 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here