Home Accident News संगमनेर दुर्दैवी घटना: डंपरखाली सापडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

संगमनेर दुर्दैवी घटना: डंपरखाली सापडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Sangamner Accident: डंपर चालक डंपर रिव्हर्स मागे घेत असताना डंपर खाली सापडून चार वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.

Sangamner Accident Four-year-old boy died after being found under a dumper

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथे दुर्दैवी घटना घडली आहे. डंपर चालक डंपर रिव्हर्स मागे घेत असताना डंपर खाली सापडून चार वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी मेंढवन येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

माही आजीज पठाण (वय ४ वर्षे) असे या मृत बालिकेचे नाव आहे. या बाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये डंपर चालक राजेंद्र भागवत बडे याच्या विरोधात विविध कलमांतर्गत या बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे..

याबाबत अधिक माहिती अशी की, डंपर चालक राजेंद्र बडे हा सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास माळवाडी वस्ती मेंढवन येथे त्याच्या ताब्यातील डंपर हयगयीने व अविचाराने डंपर मालकाच्या घरासमोर रिव्हर्स मागे घेत होता. या दरम्यान तेथे जवळच चार वर्षे वयाची ही बालिका खेळत होती. डंपर चालकाच्या ही बाब लक्षात आली नाही. खेळत असलेली बालिका डंपर खाली सापडून मृत्यू झाला.

याबाबत  संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात रमजान अहमद पठाण (वय 60 वर्ष, रा. मेंढवन ता. संगमनेर) यांच्या तक्रारीवरून डंपर चालक आरोपी राजेंद्र बडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय खंडिझोड पुढील तपास करत आहेत.

Web Title: Sangamner Accident Four-year-old boy died after being found under a dumper

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here