Home Accident News संगमनेर: दुधाचा टँकर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू- Accident

संगमनेर: दुधाचा टँकर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू- Accident

Sangamner Accident:  लोणी-नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव नजीक दुधाचा टँकर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना.

Sangamner Bike rider killed in milk tanker-bike accident

संगमनेर: लोणी-नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव नजीक दुधाचा टँकर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. रवींद्र बाळासाहेब पवार (वय 32 वर्ष, रा. तळेगाव दिघे, संगमनेर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र बाळासाहेब पवार हा सोमवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पिंपळे येथील रवी चकोर यांच्या खडी क्रेशर वरील काम आटोपून घरी तळेगाव दिघेकडे मोटार सायकलवरून नांदूरशिंगोटे-लोणी रस्त्याने परतत असताना समोरून भरधाव वेगाने नाशिकच्या दिशेने प्रभात डेअरीचा दूध टँकर (एम. एच. 17 बीडी 4504)  येत होता. लोणी-नांदूरशिंगोटे मार्गावर हॉटेल कमलेश समोर दूध टँकरने पवार यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातानंतर जखमी पवार याला रुग्णालयात न हलविता दूध टँकर चालक पसार झाला असून  या अपघातात  रवींद्र पवार याचा मृत्यू झाला.

याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मयत रवींद्र पवार यांचा भाऊ किरण बाबासाहेब पवार याने गेलेल्या फिर्यादीवरून प्रभात डेअरीच्या दूध टँकरवरील चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक देविदास दुमणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Sangamner Bike rider killed in milk tanker-bike accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here