Home Accident News संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर ट्रक व कंटेनरमध्ये भीषण अपघात

संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर ट्रक व कंटेनरमध्ये भीषण अपघात

Sangamner Accident truck and container

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर संगमनेर खुर्द परिसरात ट्रक व कंटेनरमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला आहे.हा अपघात आज बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडला.  या अपघातात दोन्ही वाहनातील चालक व क्लीनर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक हा संगमनेरहून पुणेकडे जात होता. कंटेनर पुण्याहून संगमनेरकडे येत असताना पहाटे सहा वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर खुर्द शिवारात नवजीवन बेकरी समोर हे दोन्ही वाहने समोरासमोर धडकल्याने हा भीषण अपघात झाला. ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे तर क्लीनर गंभीर जखमी झाला आहे. कंटेनरमधील चालक व क्लीनर जखमी झाले आहे. दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

Web Title: Sangamner Accident truck and container

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here