Home अकोले संगमनेर अकोले रोड: रस्त्याची दुरुस्ती तरी करा अन्यथा रस्ता कायमचा बंद करा

संगमनेर अकोले रोड: रस्त्याची दुरुस्ती तरी करा अन्यथा रस्ता कायमचा बंद करा

Sangamner Akole Road Repair the road otherwise close the road

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील कळस ते अकोले या कोल्हार घोटी रस्त्याची दुरवस्था झाली असून मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्यावरील प्रवास धोकादायक झाला आहे. वाहन चालकांना या रस्त्यावरून खड्डे चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत असून रस्त्यांवरील अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याने रस्त्याची दुरुस्ती तरी करा अन्यथा रस्ता कायमचा बंद तरी करा अशी संतप्त प्रतिक्रया या या दोनही तालुक्यातील नागरिकांकडून येत आहे.

पुढील आठ दिवसांत रस्त्याच्या दुरुस्तीबाबत या दोनही तालुक्यातील आमदार, मंत्री यांनी जनतेसमोर रस्त्याबाबत रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. रस्त्याची बिकट अवस्था झाली असून वाहन चालविताना चालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असला तरी संबंधित खात्याला सोयरसुतक नाही. खड्ड्यांचे साम्राज्य असलेल्या या रस्त्यावरून प्रवास करताना उंटावर बसल्याचा अनुभव येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या खड्ड्यांमुळे रस्ताच राहिला नसून खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे यामुळे अपघातांच्या संखेत वाढ झाली आहे.

संगमनेर अकोले रोडवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरील प्रवास नकोसा झाला असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

या रस्त्यावर नवीन काम सुरु असले तरी नागरिक रस्त्याचा त्रास भोगत असून याच रस्त्यावरून प्रवास करावा लागणार असल्याने रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. संगमनेर अकोले तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी व बांधकाम विभाग यांनी याबाबत लवकरच तोडगा काढावा अशी संतप्त नागरिकांकडून मागणी होत आहे.

Web Title: Sangamner Akole Road Repair the road otherwise close the road

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here