संगमनेर तालुक्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला, मुलानेच केला पित्याचा खून
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येते खंदरमाळवाडीच्या हद्दीत रस्त्यावर एक मृतदेह आढळून आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलानेच आपल्या पित्याचा खून केल्याचे उघडकीस आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील आंबी फाटा परिसरात खंदर माळवाडीच्या हद्दीत अज्ञात ४५ ते ५० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी घारगाव पोलिसांना या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक सुनील पाटील, राजू खेडकर, सुरेश टकले आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान पोलीस हवालदार सुरेश टाकले हे चहा पिण्यासाठी आंबी खालसा फाट्यावरील एका हॉटेलमध्ये गेले असता चहा पीत असताना त्यांना एक समोर एक तरुण बसलेला आढळून आला. त्याच्या कपड्यांना रक्ताचे डाग आढळून आले. डोळ्यालाही जखम झाली होती. त्यामुळे टकले यांना संशय आल्याने ते थेट त्या तरुणाला घटनास्थळी नेले असता याला ओळखतो का असे विचारले असता म्हणाला ते माझे वडील आहे. पोलिसांचा संशय अधिक बळविल्याने थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी सिताराम भीमा काळे याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे करीत आहेत. काही तासांतच पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
Web Title: the unidentified body of Isma was found in Sangamner taluka