Home Accident News Accident | संगमनेर: भाऊबीजेला जात असताना अपघातात बाप लेकांचा मृत्यू

Accident | संगमनेर: भाऊबीजेला जात असताना अपघातात बाप लेकांचा मृत्यू

Sangamner Baap Lake died in an accident while going to Bhaubij

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यात नाशिक पुणे महामार्गावर बोटा परिसरात कारने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने अपघात घडला. यामध्ये बाप लेक दोघे ठार झाले तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.

संगमनेर तालुक्यात नाशिक पुणे महामार्गावर बोटा परिसरात शनिवारी सायंकाळी सायंकाळी घडली. पती दत्तात्रय सखाराम सासवडे आणि मुलगा सार्थक सासवडे हे पारनेर तालुक्यातील रहिवासी असून ते दुचाकीहून दिवाळी सणानिमित्त भाऊबीजेला भावाची ओवाळणी करण्यासाठी नांदूर खंदरमाळ येथील येठेवाडी येथे चालले होते. शनिवारी सायंकाळी नाशिक पुणे महामार्गावर बोटा शिवारात आले असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये अपघातात पती व मुलगा हे ठार झाले. पत्नी गंभीर जखमी झाली.  अपघातानंतर तिघांना आळे फाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र निर्मला सासवडे यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अहमदनगर येथे नेण्यात आले. तर पती दत्तात्रय सखाराम सासवडे आणि मुलगा सार्थक सासवडे यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल कैलास देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा केला.    

Web Title: Sangamner Baap Lake died in an accident while going to Bhaubij

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here