Home क्राईम संगमनेर: सोशियल मेडीयावर फोटो टाकण्याच्या धमक्या देत तीन वर्ष वारंवार बलात्कार

संगमनेर: सोशियल मेडीयावर फोटो टाकण्याच्या धमक्या देत तीन वर्ष वारंवार बलात्कार

Sangamner repeated rapes threatening to post photos on social media

संगमनेर | Rape: सोशियल मेडीयावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी साकुर या परिसरातील २२ वर्षीय तरुणीसोबत साकुर, बिरेवाडी, आळेफाटा येथे सन २०१८ ते २०२१ या दरम्यान वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तसेच तुझ्या आई वडिलांना फोटो दाखवेन, त्यांना संपवून टाकेन अशा धमक्या देत अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी फिर्यादी पिडीत मुलीने घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी घारगाव पोलीस ठाण्यात अतुल रावसाहेब कढणे रा. बिरेवाडी ता. संगमनेर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, ११ फेब्रुवारी २०१८ साली आरोपी कढणे व एका मुलीशी ओळख झाली. यातूनच मैत्री वाढत लगड वाढत गेली. भेटीगाठी होऊन संबंध अधिक घट्ट झाले. या काळातच आरोपीने तरुणीचे फोटो काढून ठेवले आणि त्यानंतर त्याच्या मनातील कामवासना जागी होऊन तरुणीस फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत सलग तीन वर्ष विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. तिने आपल्या आई वडिलांची बदनामी होऊ नये म्हणून मौन धारण केले मात्र तिची इच्छा नसताना बळजबरी करण्याचा प्रकार असह्य झाल्याने तिने घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Sangamner repeated rapes threatening to post photos on social media

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here