Home संगमनेर संगमनेर: किरकोळ कारणातून मारहाण व महिलेचा विनयभंग

संगमनेर: किरकोळ कारणातून मारहाण व महिलेचा विनयभंग

Sangamner Beaten for minor reasons and molestation of a woman

संगमनेर: संगमनेर शहरातील जेधे कॉलनी रात्री १२: ४५ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणातून जामावाने दोन जणांना लोखंडी गज व दांडक्याने मारहाण करत शिवीगाळ केली. घरावर दगडफेकही करण्यात आली. एका तरुणीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यात आले.

याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील जेधे कॉलनी येथे राहणारे विरू किशोर जेधे हा आपल्या घरात झोपलेला असताना  यावेळी जवळचा राहणाऱ्या काही युवकांनी त्यांच्या घरासमोर आरडाओरडा केला. त्यामुळे जेधे घराबाहेर आला त्यावेळी जमावाने  तुम्ही जास्त माजले आहे.मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वागत नाही आता तुमच्याकडे बघतो असे सांगून यातील एकाने लाकडी दांडक्याने जेधे व त्याच्या पुतण्याला मारहाण केली. यावेळी एका युवतीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यात आले.

याबाबत विरू किशोर जेधे याने दिलेल्या फिर्यादीनुसार आकाश बाळू जेधे, दिनेश बाळू जेधे, संदीप बाळू जेधे, सोमा घोडेकर, मयूर चांगरे, बाळू सुवजी जेधे सर्व राहणार जेधे कॉलनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sangamner Beaten for minor reasons and molestation of a woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here