संगमनेर: मागील भांडणाच्या कारणातून एकास आठ जणांनी तलवारीने मारहाण
संगमनेर: मागील भांडणाच्या कारणातून एका युवकास आठ जणांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मालपाणी लोन्स समोर घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश सोमनाथ पोगुल वय ३० रा. इंदिरानगर असे या जखमी तरुणाचे नाव आहे. योगेश पोगुल याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश पोगुल व त्याचे मित्र आकाश गायकवाड, अक्षय शिंदे हे त्याच्या मित्राच्या दुकानासमोर गेले होते. त्यावेळी तेथे शुभम शिंदे आला आणि योगेश पोगुल यास म्हणाला तु इथे काय करतोस, योगेश म्हणाला काही नाही घरी चालालोय. त्यानंतर अचानकपणे शुभम शिंदे याने योगेश यास जमिनीवर पाडले. तु अमितच्या नादी लागतोस काय आज तुला दाखवतो असे म्हणत शुभम शिंदे, अमित रहातेकर, धीरज रहातेकर, पंकज दुधे, रवी म्हस्के, अनिल गायकवाड, पप्पू गायकवाड व इतर तीन जणांनी योगेश यास शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. शुभम शिंदे याने तलवारीने वार केला तेव्हा त्याने हातावर घेतला.यात त्याचा हात मोडला. इतर जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. त्याचा डावा पाय मोडला. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. तुला तुझ्या घरच्यासगट जाळून टाकीन अशी धमकी देण्यात आले. योगेश याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करीत आहे.
Web Title: Sangamner beat to death in a previous altercation