Home अहमदनगर जिल्हा बँकेतील कॅशियरनेच चोरले चार लाख रुपये

जिल्हा बँकेतील कॅशियरनेच चोरले चार लाख रुपये

rs stolen by the cashier of the district bank

कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख शाखेत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अ. नगर जिल्हा सहकारी बँकेत नोकरी करीत असलेल्या कॅशियराने चार लाखांची रोकड तिजोरीत ना ठेवता स्वतःच्या खिशात टाकून चोरी केल्याची घटना १२ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली.

सर्व खात्री केल्यानंतरच सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे,  ही चोरी काशियरनेच केल्याची खात्री केल्यानंतर बँकेचे कर्मचारी जितेंद्र माधव मोरे वय  ३८ रा, द्वारकानगरी कोपरगाव यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी कॅशियर बाळासाहेब नाथा पवार रा.चासनळी कोपरगाव याच्याविरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अमरनाथ गवसणे हे करीत आहे.    

Web Title: rs stolen by the cashier of the district bank

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here