Home संगमनेर संगमनेर: तरुणीवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

संगमनेर: तरुणीवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

Sangamner Bibatya attacks young woman

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथे एका तरुणीवर रात्रीच्या वेळी हल्ला करत जखमी केल्याची घटना घडली आहे.

ऋतुजा बाबासाहेब मोदड वय १ असे या तरुणीचे नाव आहे.या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. संगमनेरमध्ये एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत.  

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ऋतुजा रात्रीच्या वेळी घरातून बाहेर आली असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. तिला ओढून नेले मात्र तिने जोरजोराने आरडाओरडा केल्याने आजबाजूच्या नागरिकांनी धाव घेतल्याने तिचा जीव वाचला. तेथून बिबट्याने धूम ठोकली. यामध्ये मात्र ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्या उपचारासाठी करण्यात येणारा सर्व खर्च हा वनविभाग करणार असल्याचे समजते. तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले आले आहे अशी माहिती  वनरक्षक सी. डी. कासार यांनी दिली आहे.

Web Title: Sangamner Bibatya attacks young woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here