Home Accident News संगमनेर पुणे नाशिक महामार्गावर कोंबड्यांची पिल्ले घेऊन जाणारा पिकअप पलटी

संगमनेर पुणे नाशिक महामार्गावर कोंबड्यांची पिल्ले घेऊन जाणारा पिकअप पलटी

Sangamner pik up Accident 

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर गुंजाळवाडी शिवारात कोंबड्यांची पिल्ले घेऊन जाणारा पिकअप पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघात अनेक पिल्लांचा जीव गेला आहे. ही घटना शनिवारी दि. १० एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत डोळसणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे पुणे येथून पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कोंबड्यांची पिल्ले घेऊन संगमनेरकडे जात असलेला पिकअप (क्र. एम. एच. १२ क्यूम ९७४०) जात असताना गुंजाळवाडी शिवारात आली असता रस्त्याच्या दुभाजकाला धडकून पलटी झाला. या अपघातात एक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र कोंबड्यांची पिल्ले रस्त्यावर पडली होती. काही पिल्लांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती समजताच डोळसणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ दिवटे, मनीष शिंदे, अरविंद गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातस्थळी क्रेनच्या सहायाने पिकअप बाजूला घेत वाहतूक सुरळीत करण्यात आली.   

Web Title: Sangamner pik up Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here