Maharashtara Lockdown: राज्यात दोन दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय होणार, ८ की १४ दिवस
Maharashtara Lockdown: थोडी कळ सोसावी लागेल. साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन गरजेचा आहे असे मत मुख्यमंत्री यांनी मांडले. दुसरा कोणता पर्याय नाही. ८ दिवसांच्या कडक लॉकडाऊन एकमेव पर्याय येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्यातील स्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.
तज्ञांच्या मते १४ दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. याला मुख्यमंत्री यांनी दुजोरा दिला आहे. मात्र किमान ८ दिवस लॉकडाऊन करण्याचा विचार असून ८ दिवसांनंतर हळूहळू एक एक गोष्ट सुरु करू अशी भूमिका मुख्यमंत्री यांनी मांडली आहे.
आमदारांचा विकास निधी २ कोटी रुपयांनी कमी करून कामगारांना ५ हजार रुपये द्या अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.
राज्यात कटू निर्णय घेतला तर कोरोनाची साखळी तुटेल, वेळ प्रसंगी कटू निर्णय घ्यावे लागेल असे मत बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
सर्वांचे ऐकून मुख्यमंत्री यांनी निर्णय घ्यावा आमचे पूर्ण सहकार्य असे असं अजित पवार म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. व्यापाऱ्याचे व सर्व सामान्यांचे प्रश्न अगोदर मार्गी लावावे नंतर लॉकडाऊनचा विचार करावा असे मत देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले.
Web Title: Maharashtara Lockdown decision after two days