Home संगमनेर संगमनेर: विवाहित तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला

संगमनेर: विवाहित तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला

Sangamner body of a married woman was found in a well

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्याच्या खंदरमाळवाडी येथे लघुशंकेला जाते असे सांगून गेलेल्या विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याची घटना घडली आहे.

कविता सागर साळुंखे वय २५ असे मयत विवाहितेचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास जाते असे सांगून कविता घराच्या बाहेर पडली. बराच उशोर होऊनही ती परत न आल्याने नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला.

दरम्यान गावातील शिवाजी कसबे यांच्या शेतातील विहिरीत कविता हिचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. घारगाव पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.सासरे शिवदास साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.   

Web Title: Sangamner body of a married woman was found in a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here