Home संगमनेर संगमनेर: अंगणात साडे चार वर्षाचा मुलगा खेळताना बिबट्याचा हल्ला, मुलगा गंभीर जखमी

संगमनेर: अंगणात साडे चार वर्षाचा मुलगा खेळताना बिबट्याचा हल्ला, मुलगा गंभीर जखमी

Sangamner boy is attacked by a bibatya while playing in the yard

संगमनेर | Sangamner: तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे बिबट्याने केलेल्या साडे चार वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली. धांदरफळ खुर्द येथील माणकेश्वर मळ्यात या घटनेत शिवसागर खताळ हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

घराबाहेर अंगणात तो खेळत असताना अचानक बिबट्याने त्याच्या मानेला व डोक्याला चावा घेतला. बिबट्याने हल्ला केल्याचे समजताच परिसरातील ग्रामस्थांनी आरडाओरडा केला यामुळे बिबट्या पळून गेला. हल्ल्यात जखमी झालेल्या मुलास त्वरित संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचरासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.  

Web Title: Sangamner boy is attacked by a bibatya while playing in the yard

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here