Home अहमदनगर बनावट सोने देऊन घेतले कर्ज, १५९ कर्जदारांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट सोने देऊन घेतले कर्ज, १५९ कर्जदारांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar News Loans taken with fake gold

अहमदनगर | Ahmednagar News: नगर अर्बन बँकेतील कोट्यावधी रुपयांच्या सोने तारण अपहरण प्रकरणी अखेर सोमवारी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये गोल्ड किंमत ठरविणारा विशाल गणेश दहिवाळकर रा. शेवागाव याच्यासह तब्बल १५९ कर्जदारांचा समावेश आहे.

याप्रकरणी अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील शाखाधिकारी अनिल वासुमाल अहुजा यांनी फिर्याद दिली आहे. नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतून २०१७ ते २९ जून २०२१ या कालावधीत १५९ जणांनी २ हजार ७३५.१० ग्राम सोने गहाण ठेवून ५ कोटी ३० लाख १३ हजार रुपयांचे कर्ज घेतले. मुदत संपल्यावर देखील कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने गहाण असलेल्या पिशाव्यांमधील सोन्याचा लिलाव ठेवला. यावेळी सोने बनावट निघाल्याने लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली. पाच पिशव्यांमध्ये सोने बनावट आढळून आले. त्यातही पावतीप्रमाणे वजन आणि प्रत्यक्षातील वजन यात तफावत आढळून आली. त्यानंतर फिर्याद दाखल करण्यात आली.

Web Title: Ahmednagar News Loans taken with fake gold

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here