Home संगमनेर Accident | संगमनेर | पुणे-नाशिक महामार्गावर कार पिकअपचा भीषण अपघात;  एक...

Accident | संगमनेर | पुणे-नाशिक महामार्गावर कार पिकअपचा भीषण अपघात;  एक ठार, २ जखमी

Sangamner Car-pickup accident on Pune-Nashik highway One killed, two injured

Sangamner | संगमनेर:  संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा येथे कार व पिकअप चा भीषण अपघात (Accident) झाल्याने या अपघातात २ जण गंभीर जखमी तर १ जण ठार झाल्याची घटना गुरुवारी दि. १२ मे रोजी दुपारी पावणे दोन ते सव्वा दोन वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  हा अपघात आंबीखालसा फाट्यावर घडला असुन बिरप्पा पांढरे रा. जत, ता. जत, जि. सांगली हे अहमदाबाद वरुन त्यांच्या ताब्यातील पिक अप क्रमांक (.जी.जे.२७ टि.टि.७९०७ ) ही घेऊन संगमनेर मार्गे जतला चालले होते. ते दुपारी पावणे दोन वाजेच्या दरम्यान आंबीखालसा फाट्यावर आले असता त्यांनी गतीरोधक जवळ येऊन ब्रेक मारला. त्याच दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने आलेली कार क्रमांक (.एम एच १४.जे यू ६१७९ ) हीने पिकअपला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर पिक अपला जोरदार धक्का बसल्याने पिक अप दुभाजकावर जाऊन चढली.

कारमधील मोहीनी ज्ञानेश्वर पाठक(वय ७९),रा. वाल्हेकरवाडी, पिंपरी चिंचवड पुणे, चारुशिला जगदिश पिसळकर,(वय ६०)रा. नाशिक हे गंभीर जखमी झाले तर पद्माकर ज्ञानेश्वर पाठक (वय ५५)रा. वाल्हेकरवाडी , पिंपरी चिंचवड ,पुणे हे ठार झाले आहेत. जखमींना रूग्णवाहीकेद्वारे आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाचा: संगमनेर शहरात जळीतकांड: अज्ञाताने तीन वाहने जाळली

घटनेची माहिती समजताच घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू खेडकर, प्रमोद चव्हाण, किशोर लाड, सुरेश टकले यांसह डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अशोक साळवे,मनेश शिंदे अरवींद गिरी,आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. व जखमींना मदत करून वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू केली.

Web Title: Sangamner Car-pickup accident on Pune-Nashik highway One killed, two injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here