संगमनेर: इलेक्ट्रोनिक साहित्य घेऊन जाणारा मालवाहू ट्रकने घेतला पेट
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे मालवाहू ट्रकने पेट घेतला. या ट्रकमध्ये लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक साहित्य होते. हे साहित्य अजळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी दिनांक २९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मालवाहू ट्रक क्रमांक (आर जे १४ जीजे ३९७१) हीच्यावरील चालक विजय नारायण डुबे हा पुणे येथून लॅपटॉपसह आदि साहित्य घेवून गुडगाव हरियाणाकडे जात असताना वडगाव फाट्यावर आला असता या मालवाहू ट्रकने अचानक पेट घेतला. चालकाने सावधानता बाळगत हा ट्रक शेताजवळ नेला. यावेळी परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र यामधील साहित्य जळून गेले होते. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.
Web Title: Sangamner cargo truck took the stomach