Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात शाळा बंदचा निर्णय

अहमदनगर जिल्ह्यात शाळा बंदचा निर्णय

Ahmednagar School Closed one Month

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये फक्त १० वी व १२ वीचा समावेश करण्यात आला नाही. १० वी व १२ वीचे वर्ग नेहमीप्रमाणे सुरु राहतील.

अहमदनगर जिल्ह्यात करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाययोजना म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील इयत्ता १० वी व १२ वीचे वर्ग वगळता सर्व सरकारी व खासगी शाळा दिनांक ३० मार्च २०२१ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जारी केला आहे.

कोणतीही व्यक्ती अथवा संस्था संघटना यांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईस पात्र राहतील असे आदेशात सांगितले गेले आहे.  

Web Title: Ahmednagar School Closed one Month

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here