Home Accident News अकोले तालुक्यात वीरगाव येथे बाप लेकीचा शेततळ्यात बुडून मृत्यू

अकोले तालुक्यात वीरगाव येथे बाप लेकीचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Akole Baap Leki drowned in a field at Virgaon

अकोले | Akole: अकोले तालुक्यात वीरगाव येथे बाप लेकीचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेत अश्विनी कृष्णकांत  थोरात वय १६ तर वडील कृष्णकांत  जगन्नाथ थोरात वय ४३ रा, वीरगाव ता. अकोले असे मयत झाले आहेत.

अश्विनीचा शेततळ्याच्या कडेला पाय घसरून शेततळ्यात पडल्याने ती बुडत होती. आपली मुलगी शेततळ्यात बुडत असल्याचे पाहून वडिलांनी शेततळ्याकडे धाव घेत तिला वाचविण्यासाठी गेले असता वडिलांना फारसे पोहता येत नसल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. अश्विनी ही इयत्ता दहावीत शिकत होती.

या दोघांचा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविचेदन करण्यासाठी नेण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Akole Baap Leki drowned in a field at Virgaon

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here