Home Accident News Accident संगमनेर: चंदनापुरी घाटात मालवाहूक टेम्पोचा अपघात

Accident संगमनेर: चंदनापुरी घाटात मालवाहूक टेम्पोचा अपघात

Sangamner Chandanapuri Ghat tempo Accident

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात पुणे नाशिक महामार्गावर हॉटेल लक्ष्मीजवळ मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोचा टायर फुटल्याने अपघात घडला. या अपघातात वाहनचालक बालंबाल बचावला आहे मात्र टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथून जनरेटर घेऊन नाशिकच्या दिशेने जाणारा मालवाहतूक टेम्पो (एम.एच.१४ जी.यु. ८७५९) हा चंदनापुरी घाटातील हॉटेल लक्ष्मीजवळ येताच टायर फुटल्याने महामार्गाच्या कडेला जाऊन उलटा झाला. यामध्ये वाहन चालक बचाविला आहे. वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच डोळसने येथील महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त टेम्पो क्रेनच्या सहायाने बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Sangamner Chandanapuri Ghat tempo Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here