संगमनेर: चंदनापुरी येथे सात ठिकाणी घरफोड्या व सुमारे ७६५ कॅरेट डाळिंब चोरून नेले
संगमनेर: चंदनापुरी येथे सात ठिकाणी घरफोड्या व सुमारे ७६५ कॅरेट डाळिंब चोरून नेले
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत सात ठिकाणी घरफोड्या केल्या. या चोरट्यांचा शोध लागलेला नसताना रात्री पुन्हा एकदा अज्ञात चोरट्यांनी येथील एका शेतकर्याचे सुमारे ७६५ कॅरेट डाळिंब चोरून नेले. या घटनेने चंदनापुरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.
You Might Also Like: Shraddha Kapoor Upcoming Movies With Release Date
नासिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी गावात चोरट्यांनी शुक्रवारी रात्री व पहाटे प्रचंड धुमाकूळ घातला. एकाच रात्रीत सात ठिकाणी घरफोड्या करून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला.याचा तपास सुरु असतानानच गावातील गटक्रमांक दोन मध्ये असणाऱ्या किरण रोहिदास राहणे (गाभनवाडी) यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७६५ कॅरेट डाळिंब चोरी केली. आज सकाळी राहणे हे आपल्या शेतात गेले असता त्यांना शेतातील सर्व डाळिंब चोरीला गेल्याचे आढळून आले.
You Might Also Like: Rajinikanth and Akshay Kumar’s 2.0
याबाबत त्यांनी तालुका स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. चंदनापुरी परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा शोध लावावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.