राजूर: आदिवासी लाभार्थ्यांच्या कन्यादान योजनेत 76 लाखांचा अपहार
राजूर: आदिवासी लाभार्थ्यांच्या कन्यादान योजनेत 76 लाखांचा अपहार
राजूर: येथील एकात्मिक प्रकल्प कार्यालयाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत भारमल यांनी २००५ ते २००८ या काळात आदिवासी लाभार्थ्यांच्या कन्यादान योजनेत 76 लाख 20 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभाग नाशिकचे अप्पर आयुक्तांनी यासंदर्भात आदेश दिले होते.
You Might Also Like: Shraddha Kapoor Upcoming Movies With Release Date
याबाबत अधिक माहिती अशी: भारमल हे सन २००३ ते २००८ या कालावधीत राजूर व आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. रकमेचा या दरम्यान सन २००५ ते २००८ या कालावधीत आदिवासींसाठी कन्यादान योजना सुरु होती. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी मनी मंगळ सूत्र, संसारपयोगी भांड्यांचे संच वाटप करण्याची जबाबदारी भारमल यांना दिली होती. भारमल यांनी स्वतः च्या फायद्यासाठी या कालावधीतील एकूण 76 लाख 20 हजार रुपयांचे मनी मंगळसूत्र व संसारपयोगी भांड्याच्या संचाची बेकायदेशीर रित्या विल्हेवाट लावत शासकीय रकमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केली.
You Might Also Like: Rajinikanth and Akshay Kumar’s 2.0
याप्रकरणी आदिवासी विकास विभाग नाशिकचे अप्पर आयुक्ताने दिलेल्या आदेशानुसार राजूर येथील सहायक प्रकल्प अधिकारी भारमल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बी.वाय. कादरी हे करीत आहे.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.