Home संगमनेर संगमनेर: कोल्हार घोटी महामार्गावर चिखली येथे कार दुचाकी भीषण अपघात एक ठार...

संगमनेर: कोल्हार घोटी महामार्गावर चिखली येथे कार दुचाकी भीषण अपघात एक ठार दोन जखमी

Sangamner Chikahli Swift and bike Accident

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील चिखली येथे कोल्हार घोटी राज्यमहामार्गावर स्विफ्ट कार आणि दुचाकीमध्ये अपघात होऊन एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात आज गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील परिसरातून कोल्हार घोटी महामार्गावर दुचाकीस्वार (गाडी क्रमांक एम.एच.१७ ए. एक्ष. ५५८७) हा अकोलेच्या दिशेने जात असताना समोरून आलेल्या स्विफ्ट कार (क्रमांक एम.एच.२४ ए.डब्लू. ५००६) यांच्यात अपघात झाला. या दुचाकीवार तिघे जण बसलेले होते. यातील एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी संगमनेर येथील तांबे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात बाबासाहेब आव्हाड वय ३५  रा. पिंपळगाव कोन्झिरा यांचा मृत्यू झाला तर निलेश खर्डे वय २४  व किरण तांबे वय २६ हे दोघे जण जखमी झाले आहेत. या दोघांवर तांबे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Sangamner Chikahli Swift and bike Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here