Home संगमनेर संगमनेर शहरात ८ तर ग्रामीण भागात १० जण करोना पॉझिटिव्ह

संगमनेर शहरात ८ तर ग्रामीण भागात १० जण करोना पॉझिटिव्ह

Sangamner City 8 and taluka 10 Corona Positive

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात १८ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील ८ तर ग्रामीण भागातील १० जणांचा समावेश आहे.

संगमनेर शहरात इंदिरानगर येथे ७६ वर्षीय महिला, रंगारगल्ली येथे ३५ वर्षीय पुरुष, मालदाड रोड सौभाग्य मंगल कार्यालय येथे ८० वर्षीय पुरुष, वकील कॉलनी येथे ४५ वर्षीय महिला, मालदाड रोड येथे ४८ वर्षीय पुरुष, मेन रोड येथे २२ वर्षीय पुरुष, सह्याद्री कॉलेज जवळ ७९ वर्षीय पुरुष, गोविंद नगर येथे ३५ वर्षीय पुरुष असे आठ बाधित आढळून आले आहेत.

तालुक्यातील ग्रामीण भागातून पोखरी हवेली येथे ६४ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे ५४ वर्षीय पुरुष, झोळे येथे २१ वर्षीय तरुण, २६ वर्षीय महिला, ५४ वर्षीय पुरुष, कसारा दुमाला येथे ४३ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ३४,५१ व २१ वर्षीय पुरुष, घारगाव येथे ४३ वर्षीय पुरुष असे १० जण बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner City 8 and taluka 10 Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here