संगमनेरातील घटना: एकाच पक्षातील प्राध्यापक कार्यकर्ता आणि जिल्हापदाधिकारी यांच्यात हाणामारी
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात एका कार्यक्रमानंतर जेवणाला गेलेल्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये चर्चेमधून वाद निर्माण झाले. त्यांच्यात शाब्दिक चकमक उडत हाणामारी झाली. यात प्राध्यापक असलेल्या एका कार्यकर्त्याने एका पदाधिकार्याच्या डोक्यात बाटली फेकून मारल्याने पदाधिकारी जखमी झाल्याने पदाधिकार्याच्या समर्थकांनी प्राध्यापक असलेल्या कार्यकर्त्याला व त्याच्या साथीदारांना बेदम मारहाण केली.
या घटनेने एका पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांचा वाद उफाळून आला आहे. तर मारहाण झालेल्या पदाधिकार्याच्या समर्थकांनी संगमनेरात येवून रात्री उशीरा प्राध्यापक कार्यकर्त्याच्या घरासमोर जावून राडा केला. यामध्ये दुचाकी वाहनाचे नुकसान झाले.
महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला अॅप येथून अपडेट करा. संगमनेर अकोले न्यूज
वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याची खबर पोलिसांना लागली. शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने संगमनेरात एका पक्षाच्या दोन गटातील संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल झाली नसल्याचे समजते.
Web Title: Sangamner Clashes between professors and district office