Home Accident News संगमनेर:  नाशिक पुणे महामार्गावर कंटेनरला पिकअपची पाठीमागून जोराची धडक एक जण ठार

संगमनेर:  नाशिक पुणे महामार्गावर कंटेनरला पिकअपची पाठीमागून जोराची धडक एक जण ठार

 Sangamner container pik up Accident 

संगमनेर | Accident: शनिवारी सकाळी साडे सात वाजता अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. कंटेनरला मालवाहू पिकअपने पाठीमागून जोराची धडक देऊन अपघात घडला.

या अपघात पिकअप मधील एक जण जागीच ठार झाला आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर एकोणावीस मैल येथील बिकानेर हॉटेल समोर ही घटना घडली आहे. या अपघातात पिकअप मधील शिवाजी वाल्हेकर वय २८ रा. डोणजे ता. हवेली. जि. पुणे हा जागीच ठार झाला आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवाहू पिक अप (एम. एच. १२ एस. एफ. ८१३३) मधील चालक हा पुणे येथून संगमनेरच्या दिशेने जात असताना शनिवारी सकाळी हॉटेल बिकानेरजवळ आला असता त्याठिकाणी उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली. गाडीचा पुढचा भाग हा चक्काचूर झाला आहे.

या अपघाताची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन क्रेनच्या सहायाने वाहने बाजूला घेण्यात आली. वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली आहे.

Web Title: Sangamner container pik up Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here