अहमदनगर: कोरोनाने स्मशानही गहिवरले, अंत्यविधीसाठी वेटिंग
अहमदनगर | Ahmednagar: राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मृत्यू तांडव सुरु आहे. स्मशानभूमीही कमी पडल्याचे विदारक चित्र अहमदनगर व नांदेड जिल्ह्यात पहावयास मिळाले.
नगरमध्ये गुरुवारी ४५ मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे सर्वजण कोरोनाचेच बळी आहेत. पहाटेपर्यंत अंत्यसंस्कार सुरु होते. वर्षभरामध्ये एकाच दिवशी सर्वाधिक मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
बुधवारी १९ जणांचा तर गुरुवारी एकदम हा आकडा वाढला. अमरधाममध्ये ४२ तर दफनभूमीत ३ अशा ४५ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. २२ मृतदेहांचे ओट्यावर ठेवून अंत्यसंस्कार करावे लागले हे विदारक चित्र निर्माण झाले आहे. महापालिकेचे चार कर्मचारी हे अहोरात्र काम करीत आहे.
नांदेड मध्ये २३ मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले यामधील १३ जणांना वेटिंग करावी लागल्याने स्मशानभूमी गहिवरली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातून अमरधाम येथील स्मशानभूमीत एकच शववाहिका आहे. एकाच खेपेत पाच ते सहा मृतदेह जिल्हा रुग्णालयातून अमरधाम येथे आणले जातात.
Web Title: Ahmednagar Corona waiting for the funeral