Home महाराष्ट्र Maharashtra LockDown: लॉकडाऊनचा कालावधी वाढणार का

Maharashtra LockDown: लॉकडाऊनचा कालावधी वाढणार का

Maharashtra Lockdown Discussion Today meeting 

मुंबई: राज्यात करोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. बेड्स, औषधे, लस यांचाही तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊन काही आठवडे वाढविण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सर्वांची मते जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

दरम्यान मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेटीवार यांनी राज्यात जर करोनाची साखळी तोडायची असेल तर तीन आठवड्याचा कडक लॉकडाऊनची गरज आहे अशी भूमिका व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आदी नेते उपस्थित राहणार आहे. राज्यातील करोनाची परिस्थिती हाताबाहेर जाते काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सध्या शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कडक लॉकडाऊन आहे. इतर दिवशी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.मात्र करोनाची साखळी तोडण्यासाठी हे निर्बंध पुरेसे ठरणार नाहीत तर त्यासाठी कडक लॉकडाऊन हवा असे मत काहींचे आहे. यांसंदर्भात सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री यांनी आज बोलाविली आहे.

Web Title: Maharashtra Lockdown Discussion Today meeting 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here