Home क्राईम कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या तोंडावर रासायनिक फवारा, संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा

कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या तोंडावर रासायनिक फवारा, संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा

Sangamner Crime Chemical spray on the faces of factory officials

Sangamner Crime | संगमनेर: कंपनीच्या आवारात घुसून तिघा जणांनी विनाकारण हुज्जत घालत त्यांच्यावर रासायनिक द्रव्याचा फवारा मारून दोघांना इजा पोहोचविल्याबद्दल कासारवाडीतील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालपाणी उद्योग समूहाच्या अकोले रस्त्यावरील कारखान्यात रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अकोले रस्त्यावरील उड्डाणपूल नजीकच्या मालपाणी इस्टेट येथे हा प्रकार घडला. कासारवाडीत राहणारे सागर वाळके, अशोक काळे व बंटी पंचारिया हे तिघे कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन गोंधळ घालीत होते. यावेळी त्यांनी सुरक्षारक्षकाने त्यांना विचारणा केली असता त्या तिघांनी अरेरावी करत अधिकाऱ्यांना बोलाविण्यास सांगितले. त्यानुसार सुरक्षा रक्षकाने संबंधित व्यवस्थापकांना माहिती दिली. त्यांनी तिघांनीही कार्यालयात चर्चेसाठी कार्यालयात बोलाविले. यावेळी कंपनीचे अधिकारी दोघे जण त्या तिघांशी चर्चा करीत असताना अचानक आरडाओरडा करत तुमच्या कारखान्यातून येणाऱ्या वासाने आम्हाला त्रास होत असल्याचे सांगू लागले. यावर अधिकाऱ्यांनी कारखान्यातील वास बाहेर जाऊ नये यासाठी कंपनीकडून राबविल्या जात असलेल्या आधुनिक उपायांची माहिती देत असताना तसेच यंत्रणाबाबत चर्चा सुरु असताना अचानक आरडाओरडा करत त्या तिघांनी अधिकाऱ्यांना धक्काबुकी करण्यास सुरुवात केली. यात बंटी पंचारीया याने आपल्या खिशातील काहीतरी वस्तू काढीत त्याचा फवारा त्या दोघांच्या तोंडावर मारला. त्यामुळे डोळ्याची व चेहऱ्याची आगाग होऊ लागल्याने आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकून कंपनीचे सुरक्षारक्षक तेथे पोहोचले व समजाविण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही धक्काबुकी करण्यात आली आणि तेथून पळ काढला. दोन्हीं अधिकाऱ्यांना रुग्णालयात नेण्यात आले. या फिर्यादीवरून सागर वाळके, अशोक काळे व बंटी पंचारिया या तिघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sangamner Crime Chemical spray on the faces of factory officials

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here