Home महाराष्ट्र Shane Warne Passes Away: दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे निधन

Shane Warne Passes Away: दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे निधन

Shane Warne Passes Away

मुंबई | Shane Warne Passes Away: क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक वृत्त हाती आले आहे.  ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. याबाबत  वीरेंद्र सेहवाग याने आपल्या ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न याचे वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. एका निवेदनात, वॉर्नच्या व्यवस्थापनाने म्हटले: “शेन त्याच्या व्हिलामध्ये प्रतिसाद देत नसल्याचे आढळले आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांनंतरही, त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने क्रिकेट चाहत्यांवर मोठी शोककळा पसरली आहे.  

मात्र त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप पुर्णपणे समोर आलेलं नाही. त्याच्या व्यवस्थापनाने मीडियाला सांगितल्यानुसार शेन त्याच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर वैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Shane Warne Passes Away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here