Home संगमनेर संगमनेर तालुका हादरला: विहिरीत आईसह तीन मुलांचा मृतदेह आढळल्याने खळबळ

संगमनेर तालुका हादरला: विहिरीत आईसह तीन मुलांचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Sangamner finding the Dead bodies of three children, including a mother

Sangamner Four Dead Bodies | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागात हादरवणारी घटना घडली आहे. कोठे खुर्द गावांतर्गत असलेल्या खांडगेदरा येथील विहीरीत आईसह दोन मुली व एका चिमुकल्या मुलाचा मृतदेह (Dead bodies) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली आहे. खांडगेदरा व कोठे खुर्द गावावर शोककळा पसरली. या घटनेने पठार भागातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोठे खुर्द गावांतर्गत असलेल्या खांडगेदरा येथे बाळासाहेब गणपत ढोकरे, पत्नी स्वाती बाळासाहेब ढोकरे, मुलगी भाग्यश्री बाळासाहेब ढोकरे, तन्वी बाळासाहेब ढोकरे व चिमुकला मुलगा शिवम बाळासाहेब ढोकरे हे सर्वजण राहत आहे.

घरा शेजारीच असलेल्या विहिरीत स्वाती ढोकरे,(वय २८ वर्ष) भाग्यश्री ढोकरे,(वय५ वर्ष) तन्वी ढोकरे (वय साडेतीन वर्षे) व चिमुकला मुलगा शिवम (वय सहा महिने) यांचे मृतदेह आढळून आले.  या घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर चौघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहे

या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, संतोष खैरे या सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली व  खासगी रूग्णवाहीकेला बोलावून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Web Title: Sangamner finding the Dead bodies of three children, including a mother

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here