Home क्राईम संगमनेर: चालकाला मारहाण करुन पिकअप पळविली

संगमनेर: चालकाला मारहाण करुन पिकअप पळविली

Sangamner Crime: पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून लघुशंकेला गेलेल्या चालकाला चौघांनी मारहाण करत पिकअप पळवून नेल्याची घटना.

Sangamner Crime driver was beaten and the pickup ran away

संगमनेर: पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून लघुशंकेला गेलेल्या चालकाला चौघांनी मारहाण करत पिकअप पळवून नेल्याची घटना रविवारी (दि. १२) रात्री १२.१५ ते १२.३० वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात घडली. पोलिसांना कासारा दुमाला शिवारात ही पिकअप मिळून आली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चालक पंचाळ हे पिकअपमधून मशिनरीचे स्पेअरपार्ट घेऊन जात होते, त्यांनी गुंजाळवाडी शिवारात रस्त्याच्या कडेला पिकअप उभी ते लघुशंका करण्यास गेले असता तेथे आलेल्या चौघांनी त्यांना मारहाण करण्यात सुरुवात केली. त्यांची पिकअप त्या चौघांनी पळवून नेली.

पिकअप चालक महेश रतिलाल पंचाळ (वय ६०, रा. माधवनगर अवजारोड, ता. बागेडिया, जि. बडोदा, गुजरात) यांनी याबाबत फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

त्या संदर्भात पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी पिकअप आणि पिकअप पळवून नेणाऱ्या चौघांचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान कासारा दुमाला शिवारात रस्त्याच्या कडेला पिकअप मिळून आली. चोरट्यांनी पंचाळ यांचा मोबाइल आणि अडीच हजार रुपये चोरून नेले.

Web Title: Sangamner Crime driver was beaten and the pickup ran away

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here