Home संगमनेर नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळप्रकरणी सासरच्या मंडळीवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळप्रकरणी सासरच्या मंडळीवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

Sangamner Crime father-in-law's congregation for physical and mental harassment

संगमनेर | Sangamner: व्यवसायासाठी दोन लाख रुपये माहेरून आणण्याचा तगादा लावत नवविवाहितेचा सासरच्या मंडळीने शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी साक्षी बनसोड वय १९ रा. इंदिरानगर यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पती ज्ञानेश्वर बनसोड, सासू सुरेखा बनसोड, सासरा श्रीराम बनसोड व दीर रोहित बनसोड सर्व रा. वैजापूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

साक्षी बनसोड हिने फिर्यादीत म्हंटले आहे की, तिचे वडील कुटुंबापासून १२ वर्षापासून विभक्त राहतात. मध्यंतरी आई स्वाती मंडलिक रा. इंदिरानगर हिने १४ जून २०२० रोजी तिचे लग्न श्रीरामपूर येथील नरहरी महाराज मंदिरात वैजापूर येथील ज्ञानेश्वर श्रीराम बनसोड यांच्यासोबत झाले. सासरी नांदताना लग्न चांगले करू न दिल्याने वाचलेले दोन लाख रुपये व्यावसायिक कारणासाठी आणण्याचा तगादा साक्षीकडे लावला. या मागणीसाठी तिला उपाशीपोटी ठेवून मारहाण करीत शारीरिक व मानसिक छळ केला. तिला हुंड्यासाठी बाहेर काढून दिल्याने ती एक महिन्यापासून माहेरी आली आहे. तसेच दोन लाख रुपये न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी पती ज्ञानेश्वर बनसोड याने दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. 

Web Title: Sangamner Crime father-in-law’s congregation for physical and mental harassment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here