Home क्राईम संगमनेरात धक्कादायक घटना: एटीएम बदलवून एकास ३१ हजारास गंडा

संगमनेरात धक्कादायक घटना: एटीएम बदलवून एकास ३१ हजारास गंडा

Sangamner crime News 31,000 gangs by changing ATMs

Sangamner Crime News| संगमनेर: एटीएम बदलवून एकास ३१ हजारास गंडा संगमनेर शहरातील धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

एटीएम कार्ड चालू करून देतो असे म्हणत एका ४५ वर्षीय व्यक्तीला ३१ हजाराला गंडा घालण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास भास्कर मारुती घुले रा. कौठ धांदरफळ हे नवीन एटीएम चालू करण्यासाठी कॉर्पोरेट बँकेजवळ एटीएम सेंटर या ठिकाणी गेले होते. त्याच दरम्यान अनोळखी व्यक्तीने मी तुमचे एटीएम चालू करून देतो असे म्हणत घुले यांच्या जवळून एटीएम कार्ड घेतले व पिन नंबर घेतला. त्यानंतर घुले यांना दुसरे एटीएम कार्ड दिले व सदर व्यक्ती निघून गेला. त्यानंतर सदर व्यक्तींने सिन्नर येथे जाऊन घुले यांच्या एटीएम कार्ड ने ३१ हजार रुपये काढून घेतले.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अपडेट बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: संगमनेर अकोले न्यूज 

सदर प्रकार लक्षात आल्यानंतर भास्कर घुले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार शिवाजी फटांगरे हे घटनेचा अधिक तपास करीत आहे.

Web Title: Sangamner crime News 31,000 gangs by changing ATMs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here