Home Ahmednagar Live News अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस पाच वर्ष सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस पाच वर्ष सक्तमजुरी

Ahmednagar Accused of torturing a minor girl gets five years hard labor

अहमदनगर|Ahmednagar:  अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीस ५ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा श्रीगोंदा न्यायालयाने  सुनावली आहे.

सचिन शालन पवार (रा. जामखेड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सन 2020 मध्ये जामखेड पोलीस ठाण्यात सचिन पवार याच्यावर अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा करण्यात आला होता.

सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जाऊन पवार याने तिच्यावर अत्याचार केला होता. पिडीत मुलीला अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पवार विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अपडेट बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: संगमनेर अकोले न्यूज 

सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाच्यावतीने वकील अनिल घोडके यांनी बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार एन. ए. रोहोकले यांनी मदत केली.

Web Title: Ahmednagar Accused of torturing a minor girl gets five years hard labor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here