Home क्राईम संगमनेर: विवाहित महिला सरपण आणण्यासाठी गेली असता तिचा विनयभंग

संगमनेर: विवाहित महिला सरपण आणण्यासाठी गेली असता तिचा विनयभंग

Sangamner Crime News Woman was molested

संगमनेर | Crime News: संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर येथे बुधवारी सायंकाळी विवाहित महिला चुलीसाठी सरपण आणण्यासाठी गेली असता शेतात तिला अडवून तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी महिलेने घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोखरी बाळेश्वर येथील विवाहित महिला सरपण आणण्यासाठी घराजवळील शेतात गेली असता त्याठिकाणी राजेंद्र जिजाबा फटांगरे, संकेत विजय फटांगरे, किरण संजय फटांगरे यांनी सदर महिलेला अडवून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी सदर महिलेने आरडाओरडा केला असता महिलेचा पती, सासरे, सासू घटनास्थळी येऊन त्यांनी आरोपींना समजून सांगताना आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की केली. याप्रकरणी वरील तिघांवर घारगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गांजवे करीत आहे.

Web Title: Sangamner Crime News Woman was molested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here