Home अहमदनगर ग्रामविकास अधिकाऱ्यास कार्यालयात घुसून मारहाण

ग्रामविकास अधिकाऱ्यास कार्यालयात घुसून मारहाण

 

Village development officer enters office and beaten crime Filed

कर्जत | Crime: कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील ग्रामविकास अधिकाऱ्यास एकाने दारूच्या धुंधीत उतारा मागण्याच्या कारणावरून कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संजय मद्रास काळे याने  ग्रामविकास अधिकारी एम.एस. माने यांना कार्यालयात घुसून मारहाण केली आहे. त्यांच्या अंगावरील कपडे फाडले व सरकारी दप्तर अस्ताव्यस्त केले. कार्यालयात दहशतीचे वातावरण निर्माण करून उपस्थित ग्रामस्थांना शिवीगाळ केली. तसेच आरोपीने फर्निचर अस्ताव्यस्त फेकून दिले. कार्यालयात धिंगाणा घालत शिवीगाळ केली. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा व मारहाण प्रकरणी गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास कर्जत पोलीस करीत आहे.  

Web Title: Village development officer enters office and beaten crime Filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here