महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्ड दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार
SSC Result 2021: महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्ड दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये १० चा निकाल अंतर्गत मूल्यमापन आधारे तयार करण्यात आला असून ऑनलाईन निकाल उद्या १६ जुलै २०२१ रोजी १ वाजता जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री यांनी दिली आहे.
यंदा १० वीची परीक्षा करोना पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती. मात्र दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन जाहीर करण्यात आली होती. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन अंतर्गत गुणांच्या सहायाने करण्यात आले आहे. यंदा एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी परीक्षेस पात्र होते.
अधिकृत महाराष्ट्र निकाल वेबसाईटला भेट द्या. Maharashtraeducation.com
Web Title: SSC Result 2021