Home क्राईम संगमनेर: ग्रामसेवकास धक्काबुकी व जीवे मारण्याची धमकी

संगमनेर: ग्रामसेवकास धक्काबुकी व जीवे मारण्याची धमकी

Sangamner Crime:  काम करीत असताना ग्रामसेवकास धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी, अंभोरे गावातील घटना.

Sangamner Crime village servant was beaten up and threatened with death

संगमनेर: अंभोरे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अरुण जेजुरकर यांना कामकाज करीत असताना दोन ग्रामस्थांनी धक्काबुक्की केली. अजेंडा फाडत जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करण्याची घटना गुरुवार दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोनच्या सुमारास अंभोरे ग्रामपंचायत हद्दीत घडली. याप्रकरणी ग्रामसेवक अरुण जेजुरकर यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जेजुरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ग्रामसेवक जेजुरकर हे सफाई कर्मचार्‍यांकडून गल्लीतील साफसफाईचे काम करुन घेत असताना गावातील दोन ग्रामस्थ त्या ठिकाणी आले व ग्रामसेवक जेजुरकर व दोन सफाई कर्मचार्‍यांना मोटारसायकल आडवी लावून काम करण्याची गरज नाही ते बंद करा, असे म्हणत शिवीगाळ करु लागले. यावर ग्रामसेवक व कर्मचार्‍यांनी तेथील कामकाज बंद करून स्मशानभूमीत साफसफाईचे काम सुरू केले. याही ठिकाणी हे दोन्ही इसम आले. नवनाथ हळनर याने स्मशानभूमीचे गेट लोटून उघडले व दोघांनी आत प्रवेश करत ग्रामसेवक व या कर्मचार्‍यांना बाहेर जाऊ द्यायचे नाही, असे म्हणत नवनाथ हळनर याने ग्रामसेवकांची गचांडी धरुन धक्काबुक्की करत हे करु नका, असे सांगत जिवे मारण्याची धमकी दिली.

यावर ग्रामसेवक व कर्मचार्‍यांनी दुसर्‍या गेटमधून बाहेर येऊन ग्रामपंचायत कार्यालयात जात असताना ग्रामसेवकांच्या हातात असलेला मासिक सभेचा अजेंडा रजिस्टर नवनाथ हळनर याने हिसकावून घेत फाडून बाजूला फेकून दिले. यानंतर ग्रामसेवक व कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन बसले असताना लहानू केरु खेमनर हा कार्यालयात येऊन शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. अशी ग्रामसेवक अरुण जेजुरकर यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणे, शासकीय कर्मचार्‍यांना शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भारतीय दंडसंहिता 1860 नुसार कलम 353, 341, 332, 323, 504, 506 नुसार नवनाथ धोंडिबा हळनर व लहानू केरु खेमनर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस अधिकारी खंडीझोड करत आहेत.

Web Title: Sangamner Crime village servant was beaten up and threatened with death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here