Home संगमनेर काँग्रेसला देशहितापेक्षा स्वतःच्या अस्तित्वाची चिंता, पक्षाला जोडू न शकलेले भारत जोडातायेत

काँग्रेसला देशहितापेक्षा स्वतःच्या अस्तित्वाची चिंता, पक्षाला जोडू न शकलेले भारत जोडातायेत

Sangamner: केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका (Congress) .

Congress is more concerned about its own survival than national interest

संगमनेर : पक्षाला जोडू न शकलेले भारत जोडायला निघाले आहेत. जमिनीवरील वास्तवता माहीत नसताना त्यांनी पदयात्रा सुरू केली. उद्देश आणि नैतिकता चांगली नसताना सुरू केलेल्या पदयात्रेचा काहीही परिणाम होणार नाही, अशी टीका अन्नप्रक्रिया आणि जलशक्ती विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर केली.

केंद्रीय राज्यमंत्री पटेल शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून, शुक्रवारी (दि. ३०) ते संगमनेरात आले होते. येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपच्या प्रदेश कार्यालयाचे प्रभारी रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, सरचिटणीस सुनील वाणी, सामाजिक होते.

कार्यकर्ते अमोल खताळ, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीराज डेरे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सतीष कानवडे, पक्षाचे संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक जावेद जहागिरदार, मेघा भगत आदी उपस्थित

काँग्रेस पक्षाकडे आता नेतृत्व राहिलेले नाही. सत्तेपासून दूर गेल्यामुळे हा पक्ष बेचैन झाला आहे. ऐंशीच्या दशकात आणि आताही ज्या-ज्या वेळेस काँग्रेस सत्तेपासून दूर गेली त्यावेळेस या पक्षाने राष्ट्रविरोधी शक्तींसोबत हातमिळवणी करण्यासही मागेपुढे पाहिले नाही.

संगमनेरात रस्त्याच्या कामाचा प्रारंभ

केंद्रीय मार्ग निधी २०२१-२०२२ अंतर्गत शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ संगमनेर बसस्थानक परिसरात करण्यात आला. त्यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणली. त्यामाध्यमातून देशभरात गावागावांमध्ये रस्ते बांधण्यात आले. आजही जेथे आमचे सरकार नाही. आमदार, खासदार नाहीत. अशा ठिकाणीही लोकांना विचारले तरीही तेथे अटलबिहारी वाजपेयी यांचेच नाव घेतले जाते. ग्रामीण भागाला रस्ते जोडण्याचे काम कुणी केले, हे देशातील जनतेला माहीत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे काम बजेटच्या पैशांतून नव्हे तर पेट्रोल, डिझेलवर सेस लावला, त्यातून सुरू झाले. असेही त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, अँड. बापूसाहेब गुळवे, प्रांताधिकारी डॉ. शशिकां मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदी उपस्थित होते.

Web Title: Congress is more concerned about its own survival than national interest

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here