Home महाराष्ट्र पतीचे अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून पत्नीने संशियीत महिलेच्या डोक्यात घातली फरशी

पतीचे अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून पत्नीने संशियीत महिलेच्या डोक्यात घातली फरशी

Immoral Relationship: पत्नीने संशियीत महिलेच्या डोक्यात फरशी घातल्याची धक्कादायक घटना.

Suspecting that her husband was having an immoral relationship

मुंबई: पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने आपल्या पतीला जाब विचारायचा सोडून तिने टोकाचा निर्णय घेतला. पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका पत्नीने संशियीत महिलेच्या डोक्यात फरशी घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या प्रकरणी कांजूरमार्ग पोलिसांनी ४६ वर्षीय महिलेसह हिच्यासह तिचा पती कपिल कोरी दोघांवर गुन्हे दाखल करत अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  कपिल याचे त्याच्या घरासमोर राहणाऱ्या एका महिलेशी अनैतिक संबध असल्याचा संशय त्याच्या पत्नीला होता.

याच संशयातून शुक्रवारी आरोपी महिला व जखमी महिलेमध्ये वाद झाला. या वादात राग अनावर झालेल्या कपिलच्या पत्नीने समोरील महिलेच्या डोक्यात फर्शी टाकली. ऐवढचं नाही तर तिच्या दिशेने झाडाची कुंडीही भिरकावली या मारहाणीत पीडित महिलेला गंभीर दुखापत झाली तिला उपचारासाठी गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून  असून कांजूरमार्ग पोलिस पुढील तपास करत आहे.

Web Title: Suspecting that her husband was having an immoral relationship

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here