Home संगमनेर  Crime | संगमनेर: शेतीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

 Crime | संगमनेर: शेतीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

Sangamner Crime Violent clashes between two groups over agricultural dispute

Sangamner Crime | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील बोटा येथे शनिवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शेतीच्या वादातून दोन गटांत वाद होऊन हाणामारी झाल्याचे घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी हिराबाई बबन काळे यांनी फिर्याद दिली आहे. हिराबाई काळे व त्यांचा मुलगा निलेश काळे हे त्यांनी विकत घेतलेल्या शेतात गेले असता तेथे निवृत्ती शेळके, संभाजी शेळके, राहुल शेळके रा. सर्व बोटा आले व शेती आमची आहे. तुम्ही या शेतात यायचे नाही असे म्हणत वरील दोघांना शिवीगाळ धक्काबुक्की करीत काठीने मारहाण करून दमदाटी केली. असे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी वरील तिघांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या गटाच्या वतीने अलका संभाजी शेळके यांनी फिर्याद दिली असून म्हंटले आहे अलका शेळके व त्यांच्या शेतात मका कापत असताना हिराबाई काळे व निलेश काळे रा. बोटा हे तेथे आले व ही शेती आमची आहे. तुम्ही या शेतात मका कापायची नाही असे म्हणत यांना शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. संभाजी शेळके सोडविण्यास गेले असता त्यांना निलेश काळे याने काठीने मारीत जखमी केले. पुन्हा शेतात आले तर कापून टाकीन अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी वरील दोघांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: Sangamner Crime Violent clashes between two groups over agricultural dispute

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here