Home संगमनेर Crime | संगमनेर: महिलेला मारहाण, तिघांवर गुन्हा

Crime | संगमनेर: महिलेला मारहाण, तिघांवर गुन्हा

Sangamner Crime woman beaten 

Sangamner Crime | संगमनेर: आपली सोडचिट्ठी झाली आहे. मी तुझ्याबरोबर येणार नाही असे म्हणाल्याचा राग आल्याने तिघांनी एका महिलेला व तिच्या वडिलांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील बांबळेवाडी रस्त्यावर शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

धनश्री मारुती ढवळे रा. सारोळे पठार ता. संगमनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब कैलास बुळे, सुनील संतोष वाघ, नमाजी तावाजी खांडवे यांच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनश्री व तिचे वडील मारुती ढवळे हे रस्त्याने जात होते. बांबळेवाडी शिवारात रस्त्यावर वरील तिघांनी त्यांना हटकले. यातील भाऊसाहेब बुळे हा धनश्रीला म्हणाला तु माझ्याबरोबर चाल, त्यावेळी धनश्रीने नकार दर्शवत आपली सोडचिट्ठी झाली आहे. मी तुझ्याबरोबर येणार नाही. असे म्हंटले. याचा राग आल्याने आरोपींनी धनश्री व वडिलांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भाऊसाहेब याने मारुती ढवळे याच्या हातावर दगड मारला. असे फिर्यादीत म्हंटले आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गोंधले हे करीत आहे.

Web Title: Sangamner Crime woman beaten 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here